हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप

हिंगणा निंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याला आले तलावाचे स्वरूप

निंबा अंदुरा सर्कलमधील हिंगणा निंबा अतिशय गजबजलेल्या गावाजवळ जो रस्ता जाण्यासाठी उपलब्ध आहे.

त्या त्या रस्त्यामध्ये पूर्णपणे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे रस्ता जणू पूर्णपणे गायब झाला आहे .

तसेच या रस्त्यावर पावसाचे एवढे पाणी साचले आहे की कुठून मार्ग काढावा व आपल्या गावाकडे जावे हा प्रश्न नागरिकांना व विद्यार्थ्यांना पडलेला आहे.

Related News

तिथूनच जवळ एक किलोमीटर अंतरावर श्री शिवाजी विद्यालय निंबा व कनिष्ठ विद्यालय निंबा सुद्धा आहे.

तेथे विद्यार्थी दररोज येणे जाणे करतात व पाचवीपासून ते एम ए पर्यंत विद्यार्थ्यांना येणे जाणे करावे लागते हा त्रास कधी दूर होईल

व आपणाला कधी चांगला रस्ता प्राप्त होईल हे अजूनही गुलदस्त्यातच आहे तसेच माजी सरपंच सुखलाल तायडे माजी सरपंच मुकेश तायडे यांनी विद्यमान

आमदार नितीन देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये जाऊन त्यांना रस्त्याबाबत निवेदन दिलेले आहे.

तसेच त्यांच्या समवेत तंटामुक्ती अध्यक्ष राजेश तायडे तसेच वृक्षप्रेमी शुद्धोधन तायडे यांनी श्रमदान देऊन त्या रस्त्यातील पाणी जाण्यासाठी विसर्ग तयार

करून नागरिकांना जाण्यास मदत केली या रस्त्याने जाण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागते जर रस्ता दुरुस्त नाही.

झाला तर गावकरी आंदोलनाच्या पवित्रामध्ये आहेत असे जितेंद्र तायडे हिंगणा यांनी सांगितले.

मी स्वतः पावसाळी अधिवेशनामध्ये विद्यमान बाळापुर पातूरचे आमदार नितीन देशमुख यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

लवकरच यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे व आम्हाला चांगला रस्ता सुद्धा करून मिळेल असे आश्वासन मिळाले.

सुकलाल तायडे माजी सरपंच हिंगणा

Read Also :   https://ajinkyabharat.com/aklyachaya-hirpur-gavat-antyasanskarnahi-miti-nahi-sanman-pavsadhi-dadde-nalyatun-wahoon-netaat-gavkari/

Related News