जम्मू-कश्मीर निवडणूक : उधमपूरमध्ये सर्वात जास्त मतदान

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम

टप्प्यात मंगळवारी पहिल्या चार तासांत २८.१२ टक्के मतदान

झाले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीवरून ही

Related News

माहिती मिळाली आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात कडेकोट

बंदोबस्तात जम्मू- काश्मीरमधील सात जिल्ह्यांतील ४० विधानसभा

जागांवर सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदान

केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. केंद्रशासित प्रदेशातील

३९.१८ लाखांहून अधिक मतदार ४१५ उमेदवारांचे भवितव्य

ठरवतील. या उमेदवारांमध्ये तारा चंद आणि मुझफ्फर बेग या दोन

माजी उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. उत्तर काश्मीरमधील

बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा या तीन सीमावर्ती

जिल्ह्यांमध्येही मतदान सुरू आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात

मतदान होत आहे त्यामध्ये बारामुल्ला जिल्ह्यातील बारामुल्ला,

उरी, रफियााबाद, पट्टण, गुलमर्ग, सोपोर आणि वापोरा-क्रेरी,

कुपवाडा जिल्ह्यातील कुपवाडा, कर्नाह, त्रेहगाम, हंदवाडा, लोलाब

आणि लंगट आणि बांदीपोरा जिल्ह्यातील बांदीपोरा, सोनवारी

आणि गुरेझ यांचा समावेश आहे. या १६ विधानसभा जागांसाठी

२०२ उमेदवार रिंगणात आहेत. जम्मू प्रदेशातील उपमपूर, सांबा

आणि कठुआ जिल्ह्यातील २४ विधानसभा मतदारसंघातही मतदान

होत आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, जम्मू-काश्मीर

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सकाळी ११ वाजेपर्यंत २८.१२

टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार,

कठुआ जिल्ह्यातील बानी मतदारसंघात पहिल्या चार तासांत

३४.९२ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या

आकडेवारीनुसार, एकेकाळी दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांचा

बालेकिल्ला असलेल्या सोपोरमध्ये सर्वात कमी १७.२८ टक्के

मतदान झाले. मतदानादरम्यान सुरक्षित वातावरण सुनिश्चित

करण्यासाठी निमलष्करी आणि सशस्त्र पोलिस दलांसह सुरक्षा

दलांच्या ४०० हून अधिक कंपन्या तैनात करण्यात आल्या.

Read also: https://ajinkyabharat.com/uddhav-thackerays-support-base-is-devendra-fadnavis/

Related News