शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी माणिक भट्टाचार्य यांना उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

कोलकाता

कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे आमदार

माणिक भट्टाचार्य यांना जामीन मंजूर केला. पश्चिम बंगालमधील

कोट्यवधी रुपयांच्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी

Related News

संचालनालयाने (ईडी) भट्टाचार्य यांना अटक केली होती. न्यायमूर्ती

शुभ्रा घोष यांनी भट्टाचार्य यांना त्यांचा पासपोर्ट ट्रायल कोर्टात जमा करावा

लागेल आणि तपास अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय ते शहर सोडू शकत

नाहीत या अटीवर त्यांना जामीन मंजूर केला. नादिया जिल्ह्यातील पलाशीपारा

येथील तृणमूल काँग्रेसचे आमदार भट्टाचार्य यांना २०२२ मध्ये अंमलबजावणी

संचालनालयाने राज्यातील शिक्षक भरतीतील अनियमिततेबद्दल अटक केली

होती. पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम

केले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) शिक्षक भरती घोटाळ्याचीही

चौकशी करत आहे.

Related News