सांगलीच्या चांदोली धरण परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस

वारणा

वारणा धरणाचा वक्र दरवाजा कोणत्याही क्षणी उघडणार.. 

सांगलीच्या चांदोली धरण परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झालाय.

ढगफुटीसदृश्य पावसामुळे चांदोली धरणात 26.81  टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

Related News

चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास धरणातून विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये 148 मिलिमीटर पाऊस पडला आहे.

चांदोली पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून धरणात

27 हजार 557 क्युसेक पाण्याची आवक सुरूच आहे.

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 1625 मिलिमीटर इतका पाऊस पडलाय.

त्यामुळे चांदोली धरणात 26.81 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून

धरण आता 78 टक्के भरले आहे.

चांदोली धरणातून सध्या 1 हजार 995 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास धरणातून विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.

दरम्यान  वारणा धरणातून येत्या चौवीस तासात वक्र दरवाजातून

केव्हाही पाणी सोडले जाऊ शकते.

त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ शकते.

या पार्श्वभूमीवर  नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण व्यवस्थापनकडून देण्यात आलाय.

वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ  होत आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/nilesh-dev-should-stop-working-in-swati-industries/

Related News