भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत पुणे आणि सातारा
येथील घाट परिसरात अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मान्सूनच्या हालचालींमध्ये घोणाऱ्या लक्षणीय बदलानंतर हा इशारा
Related News
अकोला (गंगानगर बायपास):
गत १० वर्षांपासून भक्तीमय उपक्रमांची परंपरा जपणाऱ्या सालासर बालाजी मंदिरात
यंदा हनुमान जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दिनांक १२ एप्रिल...
Continue reading
तेल्हारा (९ एप्रिल २०२५):
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक उत्साहात पार पडली.
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री ...
Continue reading
अकोला :
विदर्भातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी! अमरावती विमानतळावरून
अलायन्स एअर कंपनीची "मुंबई-अमरावती-मुंबई" विमानसेवा आता सुरू झाली आहे.
या सेवेमुळे अमरावती आणि मुंबई दरम्...
Continue reading
अकोट (दि. ९ एप्रिल २०२५):
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था, अकोट याच्या अध्यक्ष पदासाठी आज झालेल्या निवडीत तसलीम ताहेर पटेल
यांची चौथ्यांदा अविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या का...
Continue reading
बार्शीटाकळी, जि. अकोला (प्रतिनिधी):
आसरा माता यात्रा,अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द येथील एक प्रसिद्ध धार्मिक उत्सव...या यात्रेदरम्यान,
अनेक भक्त आणि भाविक ...
Continue reading
सात दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा न झाल्यास हंडा मोर्चाचे आयोजन
मंगरुळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे या गावातील लोकांना अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही.
याबाबत कळंबा बोडखे गावाती...
Continue reading
अकोला, दि. १० (प्रतिनिधी):
अकोला शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ७ एप्रिल रोजी
रात्री एका मोटारसायकलस्वाराने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आ...
Continue reading
मुर्तिजापूर, दि. १० (तालुका प्रतिनिधी):
तालुक्यातील रसुलपूर, विराहीत, कानडी या गावांतील शेतकऱ्यांनी नापिकी, शेतमालाला न मिळालेला आधारभूत भाव,
विमा व दुष्काळी मदतीचा अभाव यामुळे ...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे आणि माजी आमदार रामाभाऊ कराळे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना
पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हि...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न शिवनी येथून अकोल्याकडे येणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचे
अचानक नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची घटना आज घडली आहे.
डॉ....
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
अकोट तालुक्यातील बोर्डी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांबाबत तक्रारीनंतर चौकशी झाली
आणि ग्रामपंचायत सचिवासह इतर चार व्यक्तींवर उपविभागीय अधिकारी अकोट यांनी द...
Continue reading
अकोला (प्रतिनिधी):
अकोला औद्योगिक वसाहतीतील ए.डी.एम. ऍग्रो कंपनी मध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक सुरक्षा रक्षकांच्या
न्यायासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ठाम भूमिका घेत ...
Continue reading
देण्यात आला आहे. महाराष्ट्रात पाठिमागील दोन दिवसांपासून दमदार
पावसास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मुंबई शहर, उपनगर तसेच,
ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान, अनुस्कुरा घाटात शुक्रवारी रात्री उशिरा दरड कोसळली,
ज्यामुळे राजापूर-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
राज्यभरात सुरु असलेल्या असलेल्या मुसळधार पावसामुळे येत्या
काही दिवसांत आणखी भूस्खलन होण्याची शक्यता आहे, असा इशारा
आयएमडीने दिला आहे. “मान्सून राज्याभर सक्रिय आहे, आणि दक्षिण
गुजरातपासून दक्षिण केरळच्या किनारपट्टीपर्यंतचा समुद्रकिनारा
मान्सूनसाठी अनुकुल आहे,” असे IMD पुणे येथील शास्त्रज्ञ एस.डी. सानप
यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की अरबी समुद्रातून कमी दाबाचा
पश्चिम प्रवाह शुक्रवारपासून तीव्र झाला आहे आणि तो पुढील दोन ते तीन
दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावरील कमी
दाबाच्या क्षेत्रामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे, जी पश्चिमेकडे
सरकत आहे आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मान्सूनच्या प्रवाहाला मजबुती देत आहे.
IMD ने रविवारी पुणे शहरासाठी धोक्याचा आणि सावधानतेचा
इशारा दिला आहे. ज्यामध्ये कमी झालेली दृश्यमानता, निसरडे रस्ते,
वाहतूक व्यत्यय आणि सखल भागात मध्यम पाणी साचणे यासारख्या
बाबी पाहायला मिळतील असे म्हटले आहे. डोंगराळ प्रदेशात झाडांच्या
फांद्या पडणे, किरकोळ भूस्खलन आणि चिखलही पाहायला मिळेल,
असेही या इशाऱ्यात म्हटले आहे. दरम्यान, नागरिकांनी प्रवास करण्यापूर्वी
रहदारीची स्थिती तपासावी, सूचनांचे पालन करावे, पाणी साचलेले क्षेत्र
टाळावे आणि असुरक्षित ठिकाणांपासून स्वत:ला दूर ठेवावे, असे म्हटले आहे.
मुंबई शहर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उपनगरी मुंबई आणि
ठाणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये IMD ने पुढील 24 तासांसाठी
परीसरात पूरजन्य स्थिती उद्भवू शकते असे म्हटले आहे. त्यामुळे या
प्रदेशातील रहिवासी आणि प्रवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/amravati-nagpur-mahamargavar-shivshahi-bus-accident/