मराठवाड्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस

बांगलादेश

बांगलादेश आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा

तयार झाल्याने महाराष्ट्रात सध्या जोरदार पावसाचा इशारा

देण्यात आला असून या आठवड्यात ढगांच्या गडगडाटासह

Related News

मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मराठवाड्यात मागील आठवड्यात रिमझिम हलका पाऊस झाल्याने

धरण साठ्यात फार वाढ झाली नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून

मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू झालाय.  पुढील पाच दिवस

मराठवाड्यात सर्वदूर पाऊस राहण्याचा अंदाज देण्यात आलाय.

पुढील दोन दिवस मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस

होणार असून त्यानंतर दोन दिवस पावसाची विश्रांती असेल व त्यानंतर

पुन्हा एकदा सर्व दूर पाऊस होण्याची शक्यता आहे, असे प्रादेशिक

हवामान केंद्राने वर्तवले. मराठवाड्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून

जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. ओढे नाले ओसंडून वाहत असून धरण साठ्यातही वाढ होत आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 20 ऑगस्ट

रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड व परभणी जिल्हयात

तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग

अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक 21 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड, परभणी,

लातूर व नांदेड जिल्हयात तर दिनांक 22 ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर, परभणी

व हिंगोली जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट,

वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/sanjay-raus-claim-of-trying-to-oust-ajitdadanna-from-mahayutitun/

Related News