महिलांच्या सशक्तीकरणासाठी विविध आरोग्य तपासण्या आणि मार्गदर्शनाचा उपक्रम
बार्शीटाकळी :अकोला जिल्ह्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ मोहिमेअंतर्गत, बार्शीटाकळी तालुक्यातील तिवसा उपकेंद्रावर दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेचे नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
तिवसा येथील उपकेंद्रावर झालेले हे शिबिर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र आर्य आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय धानोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
शिबिरात घेण्यात आलेल्या प्रमुख तपासण्या:
सिकलसेल तपासणी,VIA टेस्ट (गर्भाशयाच्या तोंडाच्या कर्करोग तपासणी),हिमोग्लोबिन तपासणी,उच्च रक्तदाब तपासणी,शुगर तपासणी,ईसीजी तपासणी,तपासणी नंतर आवश्यकतेनुसार औषधोपचार देखील करण्यात आले.
आहार व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन:
शिबिरात सहभागी महिलांना संतुलित आहार, आरोग्यविषयक सवयी आणि स्वच्छतेबाबत माहिती देण्यात आली.
किशोरवयीन मुलींना विशेष मार्गदर्शन करण्यात आले, ज्यात मासिक पाळी स्वच्छता, पौष्टिक आहार आणि व्यायामाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
शिबिराचे आयोजक व सहभागी अधिकारी:
आरोग्य सेविका: श्रीमती आसरा भगत,समुदाय आरोग्य अधिकारी: डॉ. शारीक खान,वैद्यकीय अधिकारी: डॉ. धनंजय धानोरे
सहाय्यक कर्मचारी: भगवान चिरंगे, नितीन बोरकर, चंद्रशेखर जाधव, अहिरकर, ओम कावरे, मंगला तितुर, आम्रपाली जाधव, अमोल पाचडे, उषा कोहरे, भिमान इंगोले, निर्मला राठोड, अनुराधा लुले, विद्या लुले, सरिता राठोड, सिंधू डाखोरे, कुसुम लोखंडे, वर्षा शिंदे, रुक्मिना ठाकरे.
स्थानिक प्रशासनाचा सहभाग:
सरपंच: सौ. मंदाताई भारत बहाद्दरे,ग्रामपंचायत कर्मचारी: मनोज लुले,तंटामुक्ती अध्यक्ष: नामदेव लुले,या सर्वांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ या मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेले हे शिबिर केवळ तपासणीपुरते मर्यादित नसून, महिलांच्या आरोग्य जाणीवसंपन्नतेसाठी एक प्रभावी पाऊल आहे. तिवसा ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत आरोग्य विभागाचे आभार मानले.
read also : https://ajinkyabharat.com/healthy-women-strong-families/