आरोग्य तपासणी व रक्तदान शिबर संपन्न

आरोग्य तपासणी व रक्तदान शिबर संपन्न

कमर फौंडेशन तर्फे आरोग्य तपासणी शिबीर व रक्तदान शिबिराचे आयोजन

शहरात कमर फौंडेशन तर्फे एक आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार नितिन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष हिदायत खान,

Related News

तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेश गावंडे, शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष मुख्तार शेख, शिवसेना शहर प्रमुख निरंजन बंड, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष गुड्डू भाई यांची उपस्थिती होती.

आरोग्य तपासणी शिबीर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. या शिबिरात

हृदयविकार, हाडांचे आजार, स्त्रियांचे आजार, अपेंडिस, मधुमेह, मूत्रपिंड, नेत्र आणि विविध अन्य आजारांच्या तपासण्या डॉक्टरांनी केल्या.

डॉ. परितोष (मेडीसीन), डॉ. प्रजोत (सर्जरी), डॉ. नरेंद्र, डॉ. सुमीत (आर्थो), डॉ. तेजस (स्त्री रोग), डॉ. शुभम (नेत्र रोग) आणि आरोग्य सेवकांनी तपासणी केली.

रक्तदान शिबिरात शहरातील युवांकडून रक्तदान करण्यात आले. या शिबिरात डॉ. बी. पी. ब्लड बँकचे डॉ. कासीद खान, टेक्नीशियन

जावेद खान, शेख साहील, सह-टेक्नीशियन आनंद खंडारे, नर्स रेशमा कुरील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पडली.

कार्यक्रमाला अनीक पटेल, सै महफुज़, चंद्रकांत बारताशे, अनील भाऊ निमकंडे, अनील म्हैसने, मो. हयात जमदार, मो. शारीक, संदीप फुलारी, सै फाजी़ल, श्रीराम अवचार हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरीफ शेख, सै इरफान, सै जमील, अबरार भाई, सै हाशम, फिरोज खान, सै सादीक, सै हबीब सर यांनी कष्ट घेतले.

या कार्यक्रमाने शहरातील लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, रक्तदानासंबंधी जनजागृती देखील केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/the-tradition-of-becoming-taluka-champion-of-bidgaon-district-school-continues/

Related News