हेड पोलीस कॉन्स्टेबल अरुण रामदास घोरमोडे यांचे दुःखद निधन

हृदयविकाराने अनपेक्षित निधन; परिवारात शोककळा पसरली

मुंडगाव  –बळेगाव येथील एस.टी. महामंडळाचे कर्मचारी रामदास घोरमोडे यांचे पुत्र, हेड पोलीस कॉन्स्टेबल अरुण रामदास घोरमोडे यांचे दिनांक ५ सप्टेंबर रोजी चोहोट्टा बाजार, बळेगाव येथे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले.

अरुण घोरमोडे यांचे नुकतेच पोलीस खात्यातून एएसआय पदावरून सेवा निवृत्ती झाली होती. त्यांच्या अकस्मात निधनाने घोरमोडे परिवारात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दोन मुली, एक मुलगा आणि जावई असा मोठा आप्त परिवार उरला आहे.

त्यांचे भाऊ रमेश घोरमोडे व वैभव घोरमोडे यांचे मोठे वडील होते. समाजातील सर्व स्तरातून त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात असून, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.

 त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/businesses-are-far-away/