हवामान खात्याचा हाय अलर्ट, 160 किमी वेगाने धडकेल महातूफान

चक्रीवादळ ‘एरिन’चा तडाखा!

चक्रीवादळ ‘एरिन’चा तडाखा! हवामान खात्याचा हाय अलर्ट, 160 किमी वेगाने धडकेल महातूफान

अटलांटिक महासागरातून निर्माण झालेले चक्रीवादळ ‘एरिन’ वेगाने सरकत असून, यामुळे उत्तर लीवर्ड बेटे, व्हर्जिन बेटे आणि प्यूर्टो रिको या भागांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

हवामान विभागाने हाय अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

वादळाची तीव्रता वाढली

शुक्रवारी रात्री वाऱ्यांचा वेग 85 किमी प्रतितास होता. तो मध्यरात्रीपर्यंत 100 किमीपर्यंत वाढला.

तज्ज्ञांच्या अंदाजानुसार हा वेग येत्या तासांत 160 किमी प्रतितास पर्यंत जाऊ शकतो. हे वादळ इतके शक्तिशाली आहे की जिथे पोहोचेल तिथे विध्वंस घडवू शकते.

कोणत्या भागांना धोका?

  • उत्तर लीवर्ड बेटे

  • व्हर्जिन बेटे

  • प्यूर्टो रिको

  • टर्क्स आणि कैकोस बेटे

  • आग्नेय बहामास

फ्लोरिडावर थेट धोका नसला तरी किनारपट्टीवर उंच लाटा आणि रिप करंट्सचा धोका कायम आहे.

प्यूर्टो रिकोवर गंभीर संकट

रविवारपर्यंत प्यूर्टो रिको आणि व्हर्जिन बेटांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस, ताशी 50 किमीपेक्षा जास्त वेगाचे वारे आणि भूस्खलनाचा धोका वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाचा इशारा

नागरिकांनी घराबाहेर न पडणे, स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि किनारपट्टी भागात विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

 तज्ज्ञांच्या मते, या हंगामात एकूण 18 वादळे येण्याची शक्यता असून, त्यापैकी 5 ते 9 वादळे प्रचंड तीव्रतेचे असू शकतात.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/konkan-nagar-govinda-pathakane-vishwikram/