हातरस हादरलं! ओळख लपवून लग्न आणि सामूहिक बलात्कार

विवाहित महिलेला वर्षभर नरकयातना

 एका विवाहित महिलेवर ओळख लपवून लग्न करून पती आणि त्याच्या मित्रांनी तब्बल वर्षभर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.महिलेच्या तक्रारीनुसार, आकाश नावाने ओळख करून देणाऱ्या तरुणाशी तिने लग्न केले. मात्र, नंतर त्याची खरी ओळख नौशाद अशी असल्याचे समोर आले. त्याने महिलेवर जबरदस्तीने बंदिस्त ठेवून अत्याचार सुरू केले. एवढेच नव्हे तर आपल्या चार मित्रांसह तिला वर्षभर नरकयातना भोगाव्या लागल्या.एका दिवशी कसेबसे आरोपींच्या तावडीतून सुटून महिला आईकडे पोहोचली. त्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला. “लग्नानंतर मला त्याची खरी ओळख कळली. विरोध केल्यावर त्याने मला बंदिस्त ठेवले. रोज माझ्यावर सामूहिक बलात्कार होत होता. मोठ्या मुश्किलीने मी पळून आले,” असे पीडितेने सांगितले.दरम्यान, पीडितेच्या आईने सांगितले की, मुलीने खोट्या आधार कार्डाद्वारे लग्न झाल्याचेही उघड केले आहे. “आम्हाला आमच्या मुलीसाठी न्याय हवा आहे,” असे आईने पोलिसांकडे मागणी केली.पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर नोंदवला असून दोन आरोपींची अटक झाली आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच गजाआड केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

read also : https://ajinkyabharat.com/under-pass-canceled-karnyasathi-nationalist-aggressive/