हरयाणात वीरेंद्र सेहवागची ‘बॅटिंग’ फ्लॅाप, प्रचार केला तो उमेदवार पिछाडीवर

 

नवी दिल्ली : हरयाणामध्ये आज मतमोजणी सुरू आहे. हरियाणात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय आज काही तासांत लागणार आहे. एक्झिट पोलच्या निकालांनी उत्साही झालेल्या काँग्रेसला राज्यात १० वर्षांनंतर सरकार स्थापन करण्याचा विश्वास आहे. त्याचवेळी भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा दावा करत आहे. नवीन सरकारसाठी ५ तारखेला मतदान झाले. लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणातील विधानसभा निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातील पहिली मोठी थेट लढत आहे. दरम्यान या लढाईत भाजप आघाडीवर आहे. तर ज्या उमेदवारासाठी भारताचा स्टार क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने प्रचार केला तो उमेदवार सध्या पिछाडीवर आहे.

हरयाणामध्ये तोशम मतदारसंघात भाजपच्या श्रुती चौधरी विरुद्ध कॉँग्रेसचे ,अनिरुद्ध चौधरी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. सध्या त्या जागेवरून भाजपच्या श्रुती चौधरी या आघाडीवर आहेत. तर विशेष बाब भारतीय क्रिकेट संघातील एक माजी खेळाडू व स्टार क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने तोशम मतदारसंघात अनिरुद्ध चौधरी यांचा प्रचार करताना दिसून आला होता.तोशम मतदारसंघात भाऊ  विरुद्ध बहीण असा सामना सुरू आहे. या एकाच जागेवर बहीण आणि भाऊ दोन वेगळ्या पक्षांकडून लढत आहेत. तोशममध्ये अनिरुद्ध चौधरी आणि श्रुती चौधरी यांच्यात कडवी लढत होताना दिसून येत आहे. दरम्यान कॉँग्रेसचे उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांचा प्रचार वीरेंद्र सेहवागने केला होता. दरम्यान वीरेंद्र सेहवागने अनिरुद्ध चौधरी यांच्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला होता.

Related News

अनिरुद्ध चौधरी यांना प्रशासन चालवण्याचा अनुभव आहे. त्यांनी जनतेला जी वचने दिली आहेत, ती ते नक्कीच पूर्ण करतील. त्यामुळे अनिरुद्ध चौधरी जर का तोशममध्ये विजयी झाले तर ते जनतेला निराश करणार नाहीत, तर चांगले काम करतील असे भाष्य वीरेंद्र सेहवागने केले होते. मात्र सध्या स्थिती पाहता वीरेंद्र सेहवागने अनिरुद्ध चौधरी  यांच्यासाठी प्रचार केला होता, ते सध्या हरयाणाच्या तोशम मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

Related News