हरियाणा, जम्मू-काश्मीरचा विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर!

भारतीय

भारतीय निवडणूक आयोगानं अखेर जम्मू आणि काश्मीर तसंच

हरियाणा या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका शुक्रवारी जाहीर केल्या.

त्यानुसार, जम्मू- काश्मीरमध्ये १८, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर अशा

Related News

तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर हरयाणात एकाच टप्प्यात १ ऑक्टोबरला

निवडणूक होणार आहे. तर दोन्ही निवडणुकांचे निकाल  ४ ऑक्टोबर रोजी

जाहीर होतील. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार

यांनी ही घोषणा केली. सन २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर

आणि जम्मू -काश्मीर हे राज्य केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, “आम्ही अलीकडेच

जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा

आढावा घेण्यासाठी भेट दिली. यावेळी लोकांमध्ये निवडणुकांसाठी मोठा उत्साह दिसून आला.

त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे. लोकांना निवडणुका व्हाव्यात

अशी इच्छा आहे. तिथं शक्य तितक्या लवकर निवडणुका आयोजित करु

असं आश्वासन आम्ही दिलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी जम्मू- काश्मीरमधील

मतदान केंद्रावर लागलेल्या लांबलचक रांगा हा पुरावा आहे की,

लोकांना केवळ बदलच नव्हे तर त्या बदलाचा एक भाग बनून आवाजही उठवायचा आहे.

महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा नाही.

Read also: https://ajinkyabharat.com/70th-national-film-awards-announced-today/

Related News