विधानसभेच्या दृष्टीने महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला
आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची काही दिवसांपूर्वी भेट
घेतल्यानंतर त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली होती. आज त्यांनी
Related News
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत : उन्हाळ्यातील ताजेतवाने फुलांचे ६ नैसर्गिक पेय
मोगऱ्यापासून हिबिस्कसपर्यंत; उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी 6 फुलांची...
Continue reading
सहारा वाळवंटात मृत्यूचा सापळा; ट्रक बंद पडल्याने 50 भाविकांचा करुण अंत, दोन जणांचा चमत्कारिक बचावआफ्रिका खंडातील सहारा वाळवंटातून एक अत्यंत हृदयद्राव...
Continue reading
जून महिना खरोखरच बदलू शकतो का तुमचे प्रेमजीवन? ‘June Theory’मागील सत्य काय सांगते?
June Theory : प्रत्येक वर्षाची सुरुवात होताच लोक नवीन संकल्प करतात. काहीजण फिटनेसचे ध्येय ठेवतात...
Continue reading
झटपट आणि चविष्ट कम्फर्ट मील: Burnt Garlic Noodles ची वाढती लोकप्रियता
घरच्या घरी काही मिनिटांत तयार होणारा स्वादिष्ट पदार्थ; प्रत्येक नूडल्स प्रेमीसाठी खास पर्यायआजच्या धावपळी...
Continue reading
चहा जास्त कडक आणि कडू झाला? फेकू नका; या सोप्या उपायांनी चवदार बनवा
चहा हा भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळची सु...
Continue reading
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडण्याचे संकेत? काँग्रेसकडून थेट मविआतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव, राजकारणात खळबळ
राज्यातील राजकीय वर्तुळातून एक मोठी आण...
Continue reading
Gullak 5 Review : गीतेजली कुलकर्णी ठरली सीझनची खरी हिरो; मिश्रा कुटुंब पुन्हा जिंकते प्रेक्षकांची मने
Continue reading
दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा आगीचा कहर; नोएडातील 12 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग, 6 अग्निशमन गाड्यांची धाव
दिल्ली-एनसीआर परिसरात आगीच्या घटनांचे सत्र था...
Continue reading
यावर शिक्कामोर्तब केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राम राम करत शरद पवारांची
पुन्हा साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर
मध्ये कार्यकर्त्यांची भेट घेत हा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांची
लेक अंकिता पाटील यांनीही त्यांचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी आपण
भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर
केले होते. हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजप
कडून लढवली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय भरणे यांनी
हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. भाजपा प्रवेशानंतर हर्षवर्धन
पाटील यांना निवडणूकीत यश मिळाले नाही. त्यामुळे आता त्यांनी या पराभवाचा
वचपा काढण्यासाठी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्यकर्त्यांना सज्जड दम
हर्षवर्धन पाटील यांनी आज कार्यकर्त्यांशी बोलताना या राजकीय घडामोडींमध्ये
कोणावरही टीका न करता, सोशल मीडीया मध्ये माहिती नसताना काहीही लिहू
नका असं म्हणत आगामी विधानसभेच्या कामाला लागा असं म्हटलं आहे.
आता इंदापूरचा राजकीय वनवास संंपवायचा आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/bjp-likely-to-contest-150-to-160-seats-patil/