हर्षवर्धन पाटील यांनी केली शरद पवार गटात प्रवेशाची घोषणा

विधानसभेच्या

विधानसभेच्या दृष्टीने महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला

आहे. हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची काही दिवसांपूर्वी भेट

घेतल्यानंतर त्यांच्या घरवापसीची चर्चा सुरू झाली होती. आज त्यांनी

Related News

यावर शिक्कामोर्तब केले आहे. हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला राम राम करत शरद पवारांची

पुन्हा साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर

मध्ये कार्यकर्त्यांची भेट घेत हा मोठा निर्णय घेतला आहे. दरम्यान त्यांची

लेक अंकिता पाटील यांनीही त्यांचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी आपण

भाजप युवा मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर

केले होते. हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजप

कडून लढवली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दत्तात्रय भरणे यांनी

हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. भाजपा प्रवेशानंतर हर्षवर्धन

पाटील यांना निवडणूकीत यश मिळाले नाही. त्यामुळे आता त्यांनी या पराभवाचा

वचपा काढण्यासाठी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्यकर्त्यांना सज्जड दम

हर्षवर्धन पाटील यांनी आज कार्यकर्त्यांशी बोलताना या राजकीय घडामोडींमध्ये

कोणावरही टीका न करता, सोशल मीडीया मध्ये माहिती नसताना  काहीही लिहू

नका असं म्हणत आगामी विधानसभेच्या कामाला लागा असं म्हटलं आहे.

आता इंदापूरचा राजकीय वनवास संंपवायचा आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/bjp-likely-to-contest-150-to-160-seats-patil/

Related News