सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मधील मुंबई (बडोदा) विरुद्ध पंजाब सामन्यात मैदानावर एक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला. झंझावाती फलंदाजीसाठी चर्चेत असलेला हार्दिक पांड्या यावेळी आपल्या खेळासोबतच एका खास कृतीमुळेही चाहत्यांच्या मनात घर करून गेला. थेट खेळपट्टीवर धाव घेतलेल्या चाहत्याबाबत हार्दिकने दाखवलेल्या सौजन्यामुळे हा प्रसंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल ठरत आहे.
नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजी स्वीकारली. अभिषेक शर्माच्या तुफानी खेळीमुळे पंजाबने अवघ्या 20 षटकात 8 बाद 222 धावांचा डोंगर उभा केला. अभिषेकने केवळ 18 चेंडूत अर्धशतक झळकावत सामन्याला रंगत आणली. या डावात हार्दिक पांड्याचा गोलंदाजीतील स्पेल मात्र महागडा ठरला. चार षटकांत 52 धावा देत त्याने फक्त एकच गडी बाद केला.
मात्र दुसऱ्या डावात हार्दिकने आपल्या बॅटने सगळी कसूर भरून काढली. अवघ्या 42 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर त्याने नाबाद 77 धावांची झंझावाती खेळी केली आणि बडोद्याला अवघ्या 19.1 षटकांत थरारक विजय मिळवून दिला.
Related News
अनाया बांगरला ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी; दिग्गज क्रिकेटपटूचा निर्णयाला विरोध, म्हणाली – ‘हे पूर्णपणे चुकीचं’
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बा...
Continue reading
IND vs SL 2nd Test: भारत-श्रीलंका दुसरा कसोटी सामना ड्रॉ; नेमकं काय चुकलं?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला. या सामन्य...
Continue reading
82 चेंडूत सामन्याचा The End! अवघ्या 35 धावांवर ऑस्ट्रियाचा संघ गारद; 8 खेळाडू शून्यावर, टी20 क्रिकेटमध्ये नकोसा विक्रम
वुमन्स कॉन्टिनें...
Continue reading
IND vs SL: टीम इंडिया जिंकण्याच्या उंबरठ्यावर, तरीही कोचने दिला मोठा इशारा; नो-बॉलच्या समस्येवर सुचवला भन्नाट उपाय
IND vs SL Test Series...
Continue reading
पाकिस्तान महिला क्रिकेटची वेगवान गोलंदाज आयमन अन्वरची निवृत्ती; आता मॅच रेफ्री म्हणून नवी इनिंग
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची अनुभवी वेगवान गोलंदाज...
Continue reading
धडधाकट पुरुष, पण महिला क्रिकेटमध्ये खेळला! अनाया बांगर प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आला डॅनियल मॅकगेही; ICC ने का बदलले नियम?
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्र...
Continue reading
क्रिकेट विश्वात खळबळ! नाईट क्लबबाहेर स्टार क्रिकेटरला अटक, मध्यरात्री नेमकं काय घडलं?
लंडन : क्रिकेट विश्वातून सध्या एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ...
Continue reading
IND vs SL: पंतला अतिशहाणपणा नडला, ताबडतोब मैदान सोडावं लागलं; मॅचच्या पहिल्याच दिवशी काय घडलं?
Rishabh Pant Injury: भारत आणि श्रीलंका यांच...
Continue reading
Karn Sharma Retirement : भारतासाठी फक्त चार आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या कर्ण शर्माचा क्रिकेटला निरोप; विराटचा खास
भारतीय क्रिकेट संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केलेला ...
Continue reading
IND vs SL: आऊट होताच यशस्वी भडकला, श्रीलंकेच्या खेळाडूशी भर मैदानात राडा, थेट हेल्मेट… Video Viral
IND vs SL Test: भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी माल...
Continue reading
IND vs SL : कोलंबो कसोटीपूर्वी श्रीलंकेचा मोठा डाव; 1996 वर्ल्ड कप विजेत्या दिग्गजाकडे फलंदाजीची जबाबदारी
IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दु...
Continue reading
ICC Ranking: आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ; ट्रेव्हिस हेडची चौथ्या स्थानी घसरण, गिल-जयस्वाल कोणत्या स्थानी?
आंतरराष्ट्...
Continue reading
याच खेळीदरम्यान एक विचित्र पण मजेशीर घटना घडली. हार्दिक फलंदाजी करत असताना एक चाहता सुरक्षारक्षकांना चुकवून थेट मैदानात घुसला. उद्देश एकच – हार्दिकसोबत सेल्फी! त्याला पकडण्यासाठी पोलिसही खेळपट्टीपर्यंत धावले. पोलिसांनी चाहत्याला ताब्यात घेत बाहेर नेत असतानाही तो सतत सेल्फीसाठी आग्रह धरत होता.
तेव्हा हार्दिकने आपल्या चाहत्याला थांबवलं, पोलिसांना विनंती केली आणि स्वतः पुढे येत चाहत्यासोबत सेल्फी काढून घेतला. हा क्षण पाहून मैदानात उपस्थित चाहत्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात हार्दिकच्या कृतीचं स्वागत केलं. हा संपूर्ण किस्सा कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
या सामन्यातील दमदार कामगिरीमुळे हार्दिक पांड्याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेआधी त्याची ही खेळी भारतीय चाहत्यांसाठी उत्साहवर्धक ठरली आहे. बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’कडून त्याला नुकतीच गोलंदाजीसाठी परवानगी मिळाली असली, तरी अद्याप पूर्ण लय मिळवण्यासाठी त्याला वेळ लागणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
हवी असलेली झंझावाती कामगिरी आणि चाहत्यांप्रती दाखवलेली आपुलकी – या दोन्ही गोष्टींमुळे हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.
read also : https://ajinkyabharat.com/7-powerful-remedies-to-become-debt-free-emi-janjalatoon-baher-padanichcha-positive-formula/