खुशखबर! एमपीएससीकडून औषध निरीक्षक पदांसाठी १०९ जागांची भरती

खुशखबर! एमपीएससीकडून औषध निरीक्षक पदांसाठी १०९ जागांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) १०९ औषध निरीक्षक पदांसाठीची बहुप्रतीक्षित भरती अखेर जाहीर केली आहे.

२०२० पासून रखडलेली ही भरती प्रक्रिया आता मार्गी लागल्याने राज्यभरातील फार्मसी पदवीधरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे, यावेळी अनुभवाची अट रद्द करण्यात आली आहे, ज्यामुळे नवशिक्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरली आहे.

पूर्वीच्या भरती प्रक्रियेत ‘अनुभव’ ही अट बंधनकारक होती,

जी फार्मसी पदवी घेताच सरकारी सेवेत येऊ इच्छिणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी मोठा अडथळा ठरत होती.

मात्र, महाराष्ट्र फार्मसी फोरमने राज्यभरातील विद्यार्थ्यांसमवेत या अटीविरोधात तीन वर्षे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

शासन, मंत्रालय, आयोग यांच्याशी वेळोवेळी संवाद साधून, तांत्रिक मुद्द्यांसह कायदेशीर निवेदने सादर करत या अटीचा विरोध करण्यात आला.

या प्रक्रियेत महाराष्ट्र फार्मसी फोरमचे संचालक आदित्य वगरे यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले.

त्यांनी यासंदर्भात खालीलप्रमाणे प्रतिक्रिया दिली –

“या भरतीसाठी आम्ही मागील तीन वर्षे सातत्याने लढा दिला.

अनेक वेळा विद्यार्थ्यांमध्ये निराशा पसरली, पण आम्ही हार मानली नाही.

अनुभवाची अट चुकीची असल्याचे आम्ही संबंधित यंत्रणांना तर्कसंगतपणे पटवून दिले.

हजारो विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या संधी अव्यवहार्य अटींमुळे बुडत होत्या.

परंतु आता ती अट रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/qureshi-disabled-injustice-to-remove/