हनुमान जयंतीनिमित्त श्री गोखी हनुमान मंदिरात कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

हनुमान जयंतीनिमित्त श्री गोखी हनुमान मंदिरात कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन

आमगव्हान/कोंडोली : श्रीक्षेत्र कोडोली आमगव्हान येथील गौकर्णा नदीच्या पावन तीरावर वसलेल्या छत्रपती

शिवकालीन श्री गोखी हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमान जयंतीनिमित्त भक्तिमय उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या या उत्सवाची सुरुवात सकाळी ५ वाजता अभिषेक व पूजनाने होणार आहे.

Related News

यानंतर सकाळी ९ ते १२ दरम्यान काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून,

यामध्ये ह.भ.प. अॅड. ऋषिकेश महाराज पाटील (आसोला बु.)ह.भ.प. सार्थक कदम महाराज

कीर्तनाच्या माध्यमातून भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी १२.३० वाजता महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून,

सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक आशिष अर्जुनराव भगत तसेच

आमगव्हान-कोंडोली येथील समस्त शेतकरी व गावकरी मंडळींनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

उत्सवाचे स्थळ : श्री गोखी हनुमान मंदिर (संदीप), आशिष अर्जुनराव भगत यांचे शेतात,

कडबे सरांच्या शेतामागे, आमगव्हाण-कोंडोली मार्ग.

Related News