आधी काडी केली अन् आता भीतीने पाकिस्तानी एअरफोर्स हाय अलर्टवर

आधी काडी केली अन् आता भीतीने पाकिस्तानी एअरफोर्स हाय अलर्टवर
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी एअरफोर्स हाय अलर्टवर
Pahalgam terror attack: पहलगाम दहशतवादी हल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा
अर्धवट सोडून सकाळी दिल्लीला परतले होते. त्यानंतर मोदी अजित डोवाल यांना भेटले होते.
Pahalgam terror attack: काश्मीरच्या पहलगामल येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असणाऱ्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
तब्बल पाच दहशतवाद्यांनी तब्बल 40 ते 50 राऊंड फायर केले. यावेळी दहशतवादी गोळ्या
(Kashmir Terror Attack) घालण्यापूर्वी प्रत्येकाला त्याचा धर्म विचारत होते.
अनेक जोडप्यांपैकी केवळ पुरुषांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले आणि महिलांना सोडून दिले.
या दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन पाकिस्तानशी जोडले जात आहे.
यापूर्वी उरी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता.
त्यामुळे आता पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) पाकिस्तानची धाकधूक वाढली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य दल अलर्ट मोर्डवर गेले आहे.
पाकिस्तानी वायू दलाला सावध आणि अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.
त्यामुळे पाकिस्तानी वायूदलाची लढाऊ विमाने सध्या भारताच्या सीमेलगत सातत्याने गस्त घालताना दिसत आहे.
भारताकडून बालाकोटप्रमाणे पुन्हा एकदा एअरस्ट्राईक होऊ शकतो.
त्यामुळे पाकिस्तानी सैन्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सावध हालचाली सुरु आहेत.
तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारतीय सैन्याने आजुबाजूच्या जंगलात शोधमोहीम हाती घेतली आहे.
भारतीय सैन्याकडून भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या श्रीनगरमध्ये असून ते पहलगामला हल्ला झालेल्या ठिकाणाला भेट देण्यासाठी जाऊ शकतात.
तसेच काश्मीर परिसरात कडेकोट लष्करी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
श्रीनगरमध्ये प्रत्येक चौकात लष्कराचे जवान दिसत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अर्थात एनआयएचे पथक पहलगामला जाणार आहे.
रावळपिंडीत रचण्यात आला पहलगाम हल्ल्याचा कट सूत्रांच्या माहितीनुसार,
लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिद आणि लष्कर ए तोयबाच्या
दोन कमांडर्स हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार मानले जात आहेत.
या दहशतवादी हल्ल्यासाठी स्थानिक स्लीपर सेलचा वापर करण्यात आला.
या हल्ल्यात 6 ते 8 दहशतवाद्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
या दहशतवाद्यांनी हल्ला करण्यापूर्वी संबंधित परिसराची रेकीही केली होती.
पाकिस्तानच्या रावळपिंडीत बसून दहशतवाद्यांनी हा कट आखल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने – डोंबिवली
2) संजय लेले – डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले
पनवेल जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल

Related News