गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरे यांचं… काय डोंगर काय झाडी फेम माजी आमदार शहाजी बापू यांचं भाकीत काय?

गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरे यांचं… काय डोंगर काय झाडी फेम माजी आमदार शहाजी बापू यांचं भाकीत काय?

गुवाहाटीला गेलो तेव्हाच उद्धव ठाकरे यांचं…

काय डोंगर काय झाडी फेम माजी आमदार शहाजी बापू यांचं भाकीत काय?

आघाडीत बिघाडी झालीच आहे. आता थोड्याच दिवसात ते जाहीर करतील,
असा दावा करतानाच आगामी राजकारणाला चांगलं वळण लागेल आणि
चांगल्या लोकांच्या नेतृत्वखाली महाराष्ट्राचा कारभार चालेल,

ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आधीच कोकणात विधानसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर त्यात राजन साळवी यांनी पक्ष

सोडण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

Related News

त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या पडझडीवरून ठाकरे

गटावर त्यांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे.

शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनीही उद्धव ठाकरे

यांच्यावर निशाणा साधला आहे. आता ठाकरे गटात हम दो आणि हमारे दो राहतील,

अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली आहे.

शहाजी बापू पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे.

आम्ही गुहाटीला गेलो त्याच वेळेस उद्धव ठाकरेंचं भविष्य संपलेले होतं.

त्यांना संधी दिली होती, मात्र त्यांनी आपण निष्क्रिय आहोत हेच महाराष्ट्राला दाखवून दिलं,

असा दावा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.

भविष्यात एकाकी पडतील

खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहे,

हे निवडणुकीनंतर राजन साळवी यांना समजले म्हणून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे.

येत्या सहा महिन्यात उबाठा गटामध्ये कोणीच शिल्लक राहणार नाही.

टप्प्याटप्प्याने सगळेच खऱ्या शिवसेनेत प्रवेश करतील. उद्धव साहेब हे संजय राऊत यांच्या नादाला लागल्यामुळे

भविष्यात ते एकाकी पडतील, असा दावा शहाजी बापू यांनी केला आहे.

राऊत निर्लज्जम…

संजय राऊत हा सकाळचा भोंगा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्लज्जम सदासुखी ही बिरुदावली फक्त आणि फक्त संजय राऊत यांनाच शोभून दिसते.

शरद पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला, हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक चांगलं उदाहरण म्हणून याकडे पाहणे गरजेचे होते.

दुर्दैवानं संजय राऊत यांनी या कार्यक्रमाकडे अतिशय खालच्या नजरेने पाहिले. पवार साहेब हे राजकारणातील विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.

तर संजय राऊत हा राजकारणातील अंगणवाडीत खेळणारा वात्रट पोरगा आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

तेव्हा जय गुजरात करायचे का?

संजय राऊत महामूर्ख आहेत. साहित्यिकांविषयी जे काही बोलले ते अतिशय किळसवाणं आहेय ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही, असं सांगतानाच 2014

साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही जय महाराष्ट्र म्हणत होता, तेव्हा उद्धव ठाकरे काय जय गुजरात म्हणत होते का? याचं आधी उत्तर द्यावं.

विनायक राऊत आणि संजय राऊत हे पिसाळलेले लोक आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांचे राजकारणातील यश पचत नाही, असं ते म्हणाले.

म्हणून आदित्य दिल्लीला

उबाठा गटाच्या खासदारांची शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करण्याची मानसिकता होत चालली आहे. त्यामुळे त्यांना थोपवण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीला गेले आहेत.

परंतु आता त्याचा काही उपयोग होणार नाही. आदित्य ठाकरे हे मोकळ्या हाताने दिल्लीतून मुंबईला परत येतील, असा दावाही त्यांनी केला.

For more updates: https://ajinkyabharat.com/delhi-operation-tiger-dinner-diplomacetoon-shinde-gatacham-uddhav-senla-khendar-srikanth-shindenchya-bangalayavar-thakranche-khasdar/

Related News