गुरुपौर्णिमा हा एक केवळ उत्सव नसून, आपल्या जीवनातील गुरूंच्या स्थानाचे
स्मरण करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे.
हा दिवस आपल्याला विनम्रता, कृतज्ञता आणि सद्गुणांची शिकवण देतो.
Related News
समाजात संस्कार, नैतिकता आणि शिस्त रुजवायची असेल तर गुरूचे स्थान हे अतुलनीय आहे.
गुरू म्हणजे काय?
गुरू म्हणजे अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक. गुरूशिवाय आत्मोन्नती, सद्गती आणि यश मिळवणं अशक्य आहे.
बंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी ‘लहर की बरखा’ या काव्यात म्हटलं आहे:
“गुर निगा ही माक, गुरुवाक्य ही है संपदा
सेवा गुरु की जो न करता, वह पाता नहीं आपदा”
गुरूचे वचन हेच खरे धन आहे. गुरूंच्या सेवेत जो रमतो, त्यालाच आयुष्यात यश प्राप्त होते.
संकटांवर मात करण्याची शक्ती गुरूंच्या सहवासातून मिळते.
महर्षी व्यासांचे योगदान आणि गुरुपौर्णिमेचा उगम
गुरुपौर्णिमा ही महर्षी वेदव्यासांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरी केली जाते. त्यांनी वेदांचे विभागीकरण, पुराणांचे लेखन,
तसेच महाभारत सारख्या महान ग्रंथांची रचना केली. त्यांच्या कार्यामुळे त्यांना ‘आदिगुरू’ मानलं जातं.
म्हणूनच गुरुपौर्णिमा “व्यास पौर्णिमा” या नावानेही ओळखली जाते.
गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व
1. ज्ञान आणि शिक्षणाचा आदर – हा दिवस ज्ञान देणाऱ्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो.
2. शिष्य-गुरू परंपरा – पूर्वी शिष्य गुरूकुलात राहून शिक्षण घेत. आजही गुरूंच्या मार्गदर्शनाने शिष्य जीवनात यशस्वी होतात.
3. परंपरेचा सन्मान – गुरुपौर्णिमा हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मीयांनी श्रद्धेने साजरी केली जाते.
4. गुरू = ईश्वर – भारतीय संस्कृतीत गुरूला देवतुल्य मानले जाते – आचार्य देवो भव ही शिकवण लहानपणापासून दिली जाते.
गुरू म्हणजे कोण?
गुरू ही एक संकल्पना आहे – आई-वडील, शिक्षक, मित्र, ग्रंथ, अनुभव हे सर्व आपले गुरू असू शकतात.
आई ही आपल्या आयुष्यातील पहिली गुरू असते. ती आपल्याला चालायला, बोलायला, आणि जगायला शिकवते.
गुरुपौर्णिमा कशी साजरी करतात?
शिष्य आपल्या गुरूंचे पूजन करतात.
गुरुमंत्र जप, ध्यान, प्रवचन, भजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
शाळा, महाविद्यालय, संस्था या दिवशी गुरूजनांचा सत्कार करतात.
गुरूंना फळे, वस्त्र, पुस्तकं अशा प्रकारची गुरुदक्षिणा अर्पण केली जाते.
गुरुपौर्णिमा हे केवळ एक औपचारिक सण नाही. हा आपल्या गुरूंच्या शिकवणीवर श्रद्धा ठेवण्याचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा
आदरपूर्वक स्वीकार करण्याचा दिवस आहे. आयुष्यात चांगला गुरू मिळणं हे भाग्याचे लक्षण असते.
गुरूच्या आशीर्वादामुळेच जीवन प्रकाशमय आणि यशस्वी होतं.
“गुरू विना गती नाही, गुरू विना कृपा नाही
गुरूचं स्मरण आणि सेवाच खरी गुरुदक्षिणा!”
Read Also : https://ajinkyabharat.com/inzorit-shetakyana-dubar-crisis-200-acharwar-perani-khoambali/