ऑपरेशन प्रहार” अंतर्गत बार्शीटाकळी पोलिसांची धाड – अवैध हातभट्टीवर कारवाई
बार्शीटाकळी (जि. अकोला) | 20 ऑगस्ट 2025 – अकोला जिल्ह्यातील अवैध दारूधंदे समूळ नष्ट करण्यासाठी सुरू
असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत बार्शीटाकळी पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली.
कोथळी बु येथे रेड
आज (दि. 20 ऑगस्ट) ग्राम कोथळी बु येथे पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला. आरोपी अजय भीमराव वरठे याच्या कबज्यातून –
अंदाजे 210 लिटर सडवा मोहा (किंमत ₹31,500/-) अंदाजे 40 लिटर गावठी हातभट्टी दारू (किंमत ₹8,000/-)
असा मिळून एकूण ₹39,500/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्हा दाखल
या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन बार्शीटाकळी येथे कलम 65 (ई, क, ड, फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी पथक
ही कारवाई पोलीस निरीक्षक शंकर शेळके (स्थानिक गुन्हे शाखा, अकोला) यांच्या मार्गदर्शनाखाली PSI बोडखे, GPSI दशरथ बोरकर, हवालदार गोकुळ चव्हाण, अन्सार,
स्वप्नील यांनी केली.
या धाडीमुळे बार्शीटाकळी परिसरातील अवैध दारूधंद्यांना चाप बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/carbon/