अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी कठोर शिक्षा आणि तात्काळ कारवाईची मागणी
अकोला :अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आता सामाजिक व राजकीय क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागली आहे.
खास करून आमदार साजिद खान पठाण यांनी या घटनेवर गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
आमदार साजिद खान पठाण म्हणाले –“गुन्हेगाराची जात, धर्म, पक्ष याचा काही संबंध नसतो. तो फक्त आरोपी असतो आणि त्याला कायद्याने तात्काळ शिक्षा होणे आवश्यक आहे.”
या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे – तौहिद समीर बैद (वय 28).
आमदार पठाण यांनी या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
पोलिस प्रशासनाने कोणताही दबाव न घेता त्वरित आणि निष्पक्ष कारवाई करावी, अशीही त्यांनी खास भूमिका घेतली.
आमदार पठाण यांचे पुढचे आवाहन :“या घटनेत पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी पाठबळ देण्याची आम्ही ग्वाही देतो.”
सामाजिक न्याय आणि बालसंरक्षण यासाठी सरकारनेही कठोर पावले उचलावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सध्या नागरिक आणि समाजकार्यकर्ते या घटनेबाबत संताप व्यक्त करत असून, आरोपीच्या त्वरित अटक आणि कडक शिक्षा होण्याची मागणी जोर धरत आहे.
read also :https://ajinkyabharat.com/permanent-property-wild-ghenyachaya-and-motha-behavior/