गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण:

गुंगीचे औषध देऊन विवाहितेचे लैंगिक शोषण:

अकोला | प्रतिनिधी विशेष

बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहितेवर गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस तपास अधिक गतीने सुरू आहे.

Related News

 इंस्टाग्रामवरील ओळख ठरली महिलेच्या आयुष्यातील दुःस्वप्न

फिर्यादी विवाहितेची ओळख दोन महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर आरोपी महिला ज्योती नागेश हिवराळे हिच्याशी झाली होती.

पीडित महिलेला मूल होत नसल्याने तिच्या भावनिक स्थितेचा गैरफायदा घेत, नवस करण्याच्या बहाण्याने तिला मंदिरात नेण्याचं आमिष दाखवलं गेलं.

 गुंगीचे औषध आणि अमानुष कृत्य

5 ते 9 मे 2025 या कालावधीत ज्योती हिवराळे, तिचा पती नागेश हिवराळे व सुपेश महादेव पाचपोर

या तिघांनी संगनमत करून फिर्यादी महिलेला गुंगीचे औषध दिलं आणि तिचं लैंगिक शोषण केलं, असा आरोप आहे.

 पोलिसांकडून तत्पर कारवाई

फिर्यादीवरून बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीघांही आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून, पोलिस कोठडीत त्यांची चौकशी सुरू आहे.

 पुढील तपास सुरू

या घटनेने सामाजिक माध्यमांतील अनोळखी ओळखी आणि त्यातून होणारे गुन्हे पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

पोलीस पुढील तपासात औषधाचे प्रकार, गुन्ह्यात वापरलेली ठिकाणं आणि मोबाईल संवादाचा तपशील घेऊन अधिक माहिती घेत आहेत.

 नागरिकांना आवाहन
पोलीस आणि सायबर तज्ज्ञांनी सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी विश्वास ठेऊ नये, अशा सूचना पुन्हा दिल्या आहेत.

जर कोणत्याही प्रकारचे फसवणूक, धमकी, आमिष किंवा शारीरिक अत्याचाराचे प्रकार लक्षात आल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

Read Also : https://ajinkyabharat.com/pakistanchaya-hati-aslel-anastra-safe/

Related News