राहुल गांधी यांची एटीएस कडून चौकशी करा -गुणरत्न सदावर्ते

राहुल गांधी अमेरिकन दौऱ्यावर होते. तिथल्या विद्यापीठात

त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी अनेक प्रश्न आणि

मुद्यांवर त्यांनी त्यांची मतं मांडली. त्यावरुन देशात एकच

Related News

वादंग उठले. काही प्रश्नावर त्यांनी दिलेल्या उत्तरांनी त्यांच्या

मित्रपक्षांना पण अडचणीत आणले. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी

यांच्यावर तोंडसुख घेतले. आता गांधी यांच्याविरोधात

गुणरत्न सदावर्ते यांनी मोर्चा उघडला आहे. राहुल गांधी

यांची एटीएसकडून चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

त्यांनी केलेलं वक्तव्य हे देशद्रोही वक्तव्य आहे. समानतेच्या

तत्त्वावर राहुल गांधी बोलले नाही. राहुल गांधी अपरिपक्व

आहे. त्यांचं हे बोलणं असंविधानिक आहे. ATS सारख्या संस्थेने

राहुल गांधी यांच्या बाबतीत चौकशी करावी आणि त्यांना अटक करावे.

आम्ही त्यांच्या विरोधात आज तक्रार दाखल केली आहे, असे सदावर्ते

यांनी स्पष्ट केले. इला उमर हिला राहुल गांधी भेटतात, जी अतिरेकी

महिला आहे. विदेशात राहुल गांधी हे तिच्यासोबत काय चर्चा करतो?

शीख समुदायाचे नाही तर इतर समाजासाठी केलेलं भाष्य हे अराजकता

माजवणारा आहे, असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/high-court-grants-bail-to-manik-bhattacharya-in-teacher-recruitment-scam-case/

Related News