गुजरातमधील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू

गुजरातमधील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 18 जणांचा दुर्दैवी मृत्यू

गुजरातमधील बनासकांठा इथल्या डीसा शहरात फटाक्यांच्या कारखान्यात सकाळी 9 वाजता स्फोट झाला.

या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलासह एसडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

गुजरातमधील बनासकांठा इथल्या फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे.

Related News

या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाला. ज्यावेळी हा स्फोट झाला, तेव्हा कारखान्यात 30 कामगार काम करत होते.

स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

घटनास्थळी अग्निशमन दल आणि बचाव पथक पोहोचलं असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

डीसा हे बनासकांठामधील एक शहर आहे. आज (मंगळवार) सकाळी 9 वाजता फटाक्याच्या

कारखान्यातून स्फोटाचा आवाज ऐकू आला. हा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले,

तेव्हा कारखान्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या.

या स्फोटाची माहिती तात्काळ अग्निशमन दल आणि एसडीआरएफ टीमला देण्यात आली.

Related News