डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसा नियमांत मोठा बदल केला असून 88 लाख रूपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने टेक कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मायक्रोसॉफ्ट, मेटा, अमेझॉन नंतर गुगलनेही आपल्या कर्मचाऱ्यांना मेमोद्वारे मोठा सल्ला दिला आहे.
गुगलने कर्मचाऱ्यांना निर्देश दिले की शक्यतो लवकर अमेरिकेत दाखल व्हावे आणि आंतरराष्ट्रीय प्रवास या काळात टाळावा. तसेच, काही अडचण आल्यास तत्काळ कंपनीच्या इमिग्रेशन सपोर्ट टीमशी संपर्क साधावा. कंपनीने म्हटले की, अमेरिका सोडताना अडचणी येऊ शकतात किंवा प्रवेश नाकारला जाऊ शकतो; मात्र कंपनी कर्मचाऱ्यांच्या पाठिंशी उभी आहे.
या नियमाचा फक्त नवीन H-1B व्हिसा अर्जदारांसाठीच लागू होतो; ज्यांच्याकडे आधीच व्हिसा आहे त्यांना 88 लाख रूपये एकदाच भरावे लागणार आहेत, दरवर्षी नाही. कंपन्या अलर्ट मोडवर असून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहेत
read also :https://ajinkyabharat.com/cancercha-dhoka/
