मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या तोंडावर भारतीय सराफा
बाजारात सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
गुढीपाडवा, चैत्र नवरात्र आणि रमजान ईद यासारखे
सण एकत्र येत असल्याने सोने आणि चांदीच्या बाजारात
उत्साहाचे वातावरण आहे. जागतिक व्यापार युद्ध आणि
आर्थिक अनिश्चितता यामागची प्रमुख कारणे आहेत.
मुंबई : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
सणोत्सवाच्या आधी सोन्याच्या किमतीतील या दर वाढीमुळे तज्ञही उत्साहित आहेत.
या विशेष प्रसंगी सोन्याची खरेदी वाढण्याची अपेक्षा असून अलिकडच्या काळात वाढत्या किमतींमुळे
Related News
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
सातपुड्याच्या पायथ्याशी हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर; शेतकऱ्यांची दहशत
तुमचे वैयक्तिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावे?
सासरी आलेल्या महिलेचं घर जाळून टाकल्याची घटना विचित्र प्रकारे घडली आहे,
सावरा येथे भीषण आग; दोन जनावरांचा मृत्यू, घराची राख
दागिन्यांच्या मागणीवर परिणाम झाला पण दुसरीकडे, सोन्याची गुंतवणूक मागणी वाढली आहे.
गुढीपाडव्याला सोने खरेदीच्या टिप्स
मुंबईत सोन्याचा प्रतितोळा दर ९०००० रुपयांवर पोहोचला आहे.
त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांसह नाणे खरेदीसाठी सर्वसामान्यांचा खिसा चांगलाच रिकामा होईल.
अशा स्थितीत, तुम्हाला कमी किमतीत छोटासा दागिना घ्यायचा असेल तर मोत्याची सोन्यात जडवलेली नथ,
कानातल्या मोत्याच्या कुड्याही कमी वजनात घेऊ शकता, ज्यासाठी कमी सोनं लागते.
याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी पारंपरिक पोशाखावर बुगड्या घालण्याची हौस असते,
जे तुम्ही कमीत कमी सोन्यात घडवून घेऊ शकता.
त्याचवेळी, तुम्ही मोरणी किंवा नथनी असे दैनंदिन वापराच्या कमी वजनाच्या सोन्यात करून घेऊ शकता.
तसेच नाजुकशी अंगठीचा विचारही करू शकता.
त्यामुळे तुमचे बजेट थोडे जास्त असेल तर त्याचाही विचार करायला हरकत नाही.
चांदीच्या खरेदीचाही विचार करा
गुढीपाडव्याला सोने-चांदीची खरेदी शुभ असली तरी सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.
त्यामुळे, सोन्याचे दागिने बजेटच्या बाहेर असले तर तुम्ही चांदीचे अंगठी किंवा पैंजण खरेदीचा विचार करू शकता.
चांदीच्या अंगठ्यात एखादा मोठी किंवा इतर दगड बसवले तर अधिक शुभ आणि चांगले दिसेल.
तसेच, हिरे देखील खूप महाग असतात म्हणून दगडांनी जडलेली चांदीची अंगठी खरेदी करून उत्सव साजरा करा.