गुढघ्याएवढ्या पाण्यातून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पंचनाम्यासाठी

जोखमीचा नाला, वाहतं पाणी… तरीही तलाठी वाळके का उतरले पाण्यात?

चक्क अमिनपूर तलाठींचा पराक्रम!

मुंडगाव:अकोट तालुक्यातील अमिनपूर शेतशिवारात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अमिनपूर येथील तलाठी वाळके यांनी जीवाची पर्वा न करता थेट गुढघ्याएवढ्या पाण्यातून मार्ग काढत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून नुकसानीचा पंचनामा केला.साधारणपणे अशा परिस्थितीत कोणीच पाण्यात उतरायला धजावत नाही. कारण वाहत्या पाण्यात पाय ठेवताच वाळू सरकते आणि धोका वाढतो. मात्र शेतकऱ्यांच्या हितासाठी तलाठी वाळके यांनी धाडस दाखवत सर्वेक्षण केले.शेतशिवारातील नदीकाठी व नाल्यालगतची शेती पाण्याखाली गेली असून, या शेतांचे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात आले. त्यानंतर हा अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार आहे.या कामात स्थानिक शेतकरी शेषराव सरकटे, नागोराव सरकटे, अयुब खा, सलीम खा, अब्दुल कारिस, शांताराम म्हैसने, रमेश भेले, शे. गफ्फार, रमेश कडोते तसेच पत्रकार स्वप्निल सरकटे यांनी सहकार्य केले.अमिनपूर गावकऱ्यांनी व शेतकऱ्यांनी या कामगिरीबद्दल तलाठी वाळके यांचे मनापासून कौतुक केले.

read also : https://ajinkyabharat.com/teacher-dinacha-unique-sohna/