गुडधी गावात महिलांचा अवैध दारूविक्री विरोधात आक्रमक पवित्रा; दारूबंदीची मागणी

"दारू विक्रेत्याच्या धमकीवर महिलांचा संताप; थेट पोलिस ठाण्यात तक्रार"

अकोला : अकोल्याच्या गुडधी गावात महिलांनी अवैध दारूविक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट कारवाई केली आहे.

गावातील महिलांनी सोमवारी रात्री दारू विकणाऱ्या घरांवर धाड टाकून साठा उद्ध्वस्त केला.

या कारवाईदरम्यान एका दारू विक्रेत्याने महिलेला शिवीगाळ करत धमकावल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

या घटनेनंतर संतप्त महिलांनी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तब्बल चार तास बसून तक्रार नोंदवली.

गावातील महिलांनी राज्य सरकारकडे गोवंश मास विक्रीवरील बंदीप्रमाणेच राज्यात दारूबंदी लागू करण्याची मागणी केली आहे.

महिलांचा हा निर्धार आणि आंदोलन सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/telhara-municipal-council-office/