जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक सप्टेंबरमध्ये

जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक सप्टेंबरमध्ये

जीएसटी कौन्सिलची पुढील बैठक सप्टेंबरमध्ये; 12 टक्के स्लॅब रद्द होण्याची शक्यता, महागाईत होऊ शकते घट

नवी दिल्ली – वस्तू व सेवा कर (GST) मध्ये मोठ्या सुधारणांची वाट पाहत असलेल्या ग्राहक व व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

सप्टेंबर महिन्यात जीएसटी कौन्सिलची दोन दिवसीय बैठक होण्याची शक्यता आहे.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत विद्यमान 5 करस्लॅबपैकी (0%, 5%, 12%, 18%, 28%) 12 टक्के स्लॅब रद्द करून

कर संरचना “स्टॅण्डर्ड” व “मेरिट” अशा दोन गटांमध्ये विभागण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. यामुळे जीएसटी प्रणालीतील गुंतागुंत कमी होणार आहे.

सध्या जीएसटीचे चार प्रमुख स्लॅब आहेत:

  • 5% स्लॅब – चहा, साखर, कॉफी आणि खाद्यतेल यांसारख्या आवश्यक वस्तू

  • 12% स्लॅब – लोणी, तूप, प्रोसेस्ड फूड, बदाम, मोबाईल, फळरस, भाज्या, फळे, सुकेमेवे इत्यादी

  • 18% स्लॅब – हेअर ऑईल, टूथपेस्ट, आईसक्रीम, पास्ता यांसारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू

  • 28% स्लॅब – कार, महागडे कपडे व बूट, एअर कंडिशनर, लक्झरी वस्तू आणि तंबाखू उत्पादने

महागाईत घट होण्याची अपेक्षा

2018 मधील जागतिक बँकेच्या अहवालात भारतातील जीएसटी प्रणाली जगातील सर्वाधिक गुंतागुंतीच्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या महागड्या करपद्धतींपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जगातील 49 देशांत एकच स्लॅब असून 28 देशांत दोन स्लॅब आहेत. फक्त पाच देशांतच चार किंवा अधिक स्लॅब आहेत.

भारतात सध्या 21% वस्तू 5% स्लॅबमध्ये, 19% वस्तू 12% स्लॅबमध्ये आणि 44% वस्तू 18% स्लॅबमध्ये येतात. 12% स्लॅब रद्द झाल्यास दैनंदिन वस्तूंच्या किमती कमी होऊन महागाईत घट होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधानांचा जीएसटी सुधारांवर भर

स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “या दिवाळीत मी मोठी भेट देणार आहे.

मागील आठ वर्षांत आम्ही जीएसटीमध्ये मोठे सुधार केले आहेत आणि कर प्रणाली सुलभ केली आहे. आता पुनरावलोकनाची वेळ आली आहे.

आम्ही हे पूर्ण केले आहे, राज्यांशी चर्चा केली आहे आणि आता ‘पुढील पिढीतील जीएसटी सुधार’ लागू करण्यास तयार आहोत.”

READ ALSO :https://ajinkyabharat.com/bandhan-chitrapatachaya-setting-setting-raga/