चंदन जंजाळ
ग्रामिण भागातील पारंपरिक नागपंचमीचा सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने साजरा करण्यात आला.
अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही ग्रामस्थांनी जपली आहे.
या दिवशी शेतकरी आपले बैल, गायी आणि अन्य जनावरे नागदेवतेच्या दर्शनासाठी मंदिरात नेतात,
विशेषतः श्री सोपीनाथ मंदिरात भेट देतात. नागपंचमीच्या दिवशी शेतीकाम पूर्णपणे बंद ठेवले जाते,
कारण या दिवशी साप – शेतकऱ्याचा मित्र – याचा सन्मान केला जातो.
ग्रामीण भागात नागदेवतेला विशेष पूजेसह दूध, हळद-कुंकू, फुले अर्पण करून श्रद्धा व्यक्त केली जाते.
साप हा नागवंशीयांचा प्रतिनिधी मानला जातो, आणि म्हणूनच नागपंचमी हा त्यांच्यासाठी विशेष महत्वाचा सण मानला जातो.
या पारंपरिक सणामुळे गावोगावी सामाजिक एकोपा, श्रद्धा आणि निसर्गस्नेह जपण्याचा आदर्श दिसून येतो.
Read Also : https://ajinkyabharat.com/bettal-folk-serpapashahi-poison/