गोव्यात विनय जामनिकची सुवर्ण-रौप्य पदकांची झळाळी

गोव्यात

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत घवघवीत यश; आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

गोव्यातील मडगाव येथे दि. १८ व १९ डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत मूर्तिजापूरच्या विनय मिलींद जामनिक याने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली. या दमदार यशामुळे विनयची नेपाळ किंवा श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड निश्चित झाली आहे.

विनय जामनिक हा मूर्तिजापूर हायस्कूल, मूर्तिजापूर येथे इयत्ता सहावीत शिक्षण घेत असून तो ब्रम्ही (ता. मूर्तिजापूर) येथील रहिवासी आहे. अल्पवयातच राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विनयने आपल्या कौशल्याची ठसा उमटवला. स्पर्धेदरम्यान त्याने तांत्रिक अचूकता, वेग, ताकद आणि आत्मविश्वास यांचा प्रभावी संगम साधत परीक्षक व प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली.

ही यशस्वी कामगिरी एम.बी. कराटे संचालक व प्रमुख प्रशिक्षक सेन्सई गंगाधर जाधव तसेच प्रशिक्षक समीर जाधव यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाल्याचे सांगण्यात आले. सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि कठोर मेहनतीचे हे फळ असल्याचे प्रशिक्षकांनी नमूद केले.

Related News

विनयने आपल्या यशाचे श्रेय आजी गयाबाई जामनिक, वडील मिलींद जामनिक, आई शिल्पा जामनिक, नातेवाईक तसेच शाळेचे मुख्याध्यापक अनिल देविकर, वर्गशिक्षिका किरण भास्कर, शिक्षक दिनेश खलेलकर, अमित सोळंके व सर्व शिक्षकवृंद यांना दिले आहे.

विनयच्या या यशामुळे मूर्तिजापूर तालुक्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तो देशासाठी यश संपादन करेल, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/design-youth-parliament-2025-state-level-historical-record-of-akothya-students/

Related News