“सरकारच्या निर्णयाने उसळला संताप!

जीआरच्या होळीमागचं कारण काय?”

अकोला – मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य करताना राज्य सरकारने काढलेल्या १ सप्टेंबर २०२५ रोजीच्या  जीआरवरून ओबीसी समाज आक्रमक झाला आहे.सरकारच्या निर्णयामुळे त्यांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत अकोल्यात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात आला.मोर्चादरम्यान संतप्त ओबीसी बांधवांनी महाराष्ट्र सरकारचा जोरदार निषेध नोंदविला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच जीआरच्या प्रतींची होळी करून संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी मोठ्यासंख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांवर फसवणुकीचा आरोप

माजी आमदार हरिदास भदे यांनी या प्रसंगी मुख्यमंत्र्यांवर थेट फसवणुकीचा आरोप करताना म्हटले, “मुख्यमंत्र्यांनी आश्वासने देऊन समाजाची दिशाभूल केली. ओबीसींच्या राजकीय हक्कांवर कुणी डोळा ठेवला तर आम्ही गप्प बसणार नाही.”

समाजाचा इशारा – हक्क अबाधित राहिले पाहिजेत

ओबीसी नेते नारायण गव्हाणकर यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले,“सरकारचा निर्णय हा ओबीसींवर अन्यायकारक आहे. काढलेला जीआर तात्काळ रद्द करावा. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”

निवेदन सादर

संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सरकारने जीआर मागे घ्यावा अशी मागणी केली. ओबीसी समाजाचे हक्क अबाधित ठेवले नाहीत तर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/annapurna-municipal-citizen-sang/