जागतिक आदिवासी दिनाची सुट्टी न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध
राज्यात आज सर्वत्र जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात
साजरा केला जात आहे. या दिनानिमित्त राज्य सरकारनं आदिवासी बहुल जिल्ह्यातील
Related News
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
मोखा ग्रामपंचायतीचा बेजबाबदार कारभार :
अवकाळी पावसाचा वणीसह परिसराला तडाखा;
दहीगाव प्रकरणाचा निषेध; तेल्हारा शहर बंद, बाजारपेठा ठप्प
अलीगढमधील हॉटेलमध्ये देवतांच्या चित्रांसह नॅपकिन दिल्याने गोंधळ;
पाच वर्षांनंतर कैलास-मानसरोवर यात्रेला पुन्हा सुरूवात;
चंदननगरमध्ये तरुणाचा निर्घृण खून
पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय
अकोल्यात गुड फ्रायडे भाविकतेने साजरा;
एका महिन्याच्या चिमुरडीची निर्घृणपणे हत्या….
काही सेकंदांची चूक आणि आयुष्य संपलं…
जय श्री राम ग्रुप द्वारा गौसेवा कार्य
जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावर स्थानिक सुट्टी जाहीर करावी,
अशा आशयाचा शासन आदेश काल एका अध्यादेशानुसार जाहीर केला.
या आदिवासी जिल्ह्यांमध्ये भंडाऱ्याचाही समावेश आहे.
मात्र, भंडारा जिल्हाधिकारी यांनी या शासन आदेशाची अंमलबजावणी केली नाही
आणि सुट्टीही दिली नाही, असा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदनं केला आहे.
जागतिक आदिवासी दिन असताना भंडारा जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केला नसल्यानं
त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून निषेध नोंदविण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांचा अपमान केल्याप्रकरणी
त्यांनी तातडीनं माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर उतरून जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात
आक्रमक पवित्रा घेतल्या जाईल, अशी भूमिका आदिवासी बांधवांनी घेतली आहे.
तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच्या परिपत्रकाची
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने जाळून होळी करून निषेध नोंदविला आहे.
यावेळी परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी माफी मागीतल्या शिवाय आम्ही माघार घेणार नसल्याचा पवित्राही
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे भंडारा जिल्हाध्यक्ष विनोद वट्टी यांनी बोलताना व्यक्त केलीय.
Read also: https://ajinkyabharat.com/journalist-questioner-santapale-prakash-ambedkar/