शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी; “एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही” – पालकमंत्री राठोड

“शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करा, मदत मिळेलच” – पालकमंत्र्यांचे निर्देश

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उमरखेड

व महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी नुकताच दौरा केला.

शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.

पालकमंत्री म्हणाले, “शासन अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.

पंचनामे तातडीने पूर्ण करावेत व सर्व नुकसानाची तपशीलवार नोंद घ्यावी,”

असे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.

नुकसानीची पाहणी

या पाहणी दौऱ्यात आमदार किसन वानखडे, जिल्हाधिकारी विकास मीना,

मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे,

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, उमरखेड तहसीलदार राजु सुरडकर,

महागाव तहसिलदार श्री. मस्के, पराग पिंगळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

पालकमंत्र्यांनी महागाव तालुक्यातील फुलसावंगी तर उमरखेड तालुक्यातील नारळी,

कुरली, चिखली, कोरटा, दराटी या गावांना भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या,

व्यथा जाणून घेतल्या. तसेच शाळा, आरोग्य केंद्र यांना भेट देऊन तेथील नुकसानीचीही माहिती घेतली.

मोठे नुकसान

अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे, घरांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

Read also :https://ajinkyabharat.com/ahmedabadamadhyay-pantpradhan-chantha-claim-dozens-of-deshmidhye-dhawati-made-in-india/