‘गोराईयेथील बंगला आणि शेतीची कर नाही तर गुन्हा दाखल

गोविंद बर्गेसोबत नेमकं काय घडलं?

बीड – गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
‘घातपात की आत्महत्या?’ हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. पोलीस तपासात कॉल डिटेल्स आणि चॅटिंगमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

गोविंद बर्गे यांचा मृत्यू कसा झाला?

माहितीनुसार, गोविंद बर्गे यांना नर्तिका पूजा गायकवाडकडून धमक्या मिळत होत्या –
“गोराईयेथील बंगला माझ्या नावावर कर, आणि भावाच्या नावावर पाच एकर शेतीची कर नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन” – अशा धमक्यांमुळे गोविंद बर्गे यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असण्याचा संशय आहे.
गोविंद बर्गे यांनी घरापासून काही अंतरावर गोळी झाडून आपले आयुष्य संपवले.

धक्कादायक तपशील उघडले – कॉल्स आणि चॅटिंग डिटेल्स

पोलिसांच्या चौकशीमध्ये गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांच्यामधील अनेक ठिकाणी एकत्र राहण्याचा पुरावा मिळाला आहे.

  • कॉल डिटेल्स आणि चॅटिंगमधून गोविंद बर्गे यांनी अनेक वेळा आत्महत्या करण्याच्या धमक्या दिल्याचे समोर आले आहे.

  • पूजा गायकवाडच्या बॅंक खात्याचे तपशीलही उघड झाले असून, आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आहे.

 विशेष माहिती –गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाडला सोनं, जमिन, प्लॉट सर्वकाही दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच त्यांनी “तुला नवीन घर बांधून देतो” अशी वचनबद्धता देखील दिली होती.

प्रकरणाची सध्याची स्थिती

पूजा गायकवाडला न्यायालयाने १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. आता ती जामिनासाठी अर्ज करू शकते.
सध्या पोलीस कसून चौकशी करत असून, घातपात किंवा आत्महत्येचा स्पष्ट निष्कर्ष लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
याशिवाय, गोविंद बर्गे प्रकरणामुळे राज्यभरात मोठी चर्चा सुरू असून यलो व ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आला आहे.

read also :https://ajinkyabharat.com/sanjay-rautancha-modi-sarkarwar-ghan-attack/