‘गोल्ड’न बॉय अरशदला मरियम नवाज यांचं स्पेशल गिफ्ट

अरशद नदीम

पॅरीस ऑलिंपिक विजेता अरशद नदीमचं पाकिस्तानमध्ये जंगी स्वागत

झाल्याचं पाहायला मिळालं. सासऱ्याकडून अरशदला चक्क म्हैस गिफ्ट करण्यात आल्यानंतर

सोशल मीडियातून याची खिल्ली उडवण्यात आली. मात्र, आता अरशदला

Related News

अनेक महागडे गिफ्ट मिळत आहेत. पाकिस्तानच्या पंजाबच्या प्रांतातील मुख्यमंत्री

मरयम नवाज यांनी अर्शदला महागडी कार गिफ्ट केली आहे. विशेष म्हणजे या कारचा नंबरही खास आहे.

अरशद नदीमने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सुवर्णपदक जिंकले.

अर्शदने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. भारताच्या नीरज चोप्राला हरवून

त्याने सुवर्णपदक जिंकले. आता, सुवर्णपदक जिंकून पाकिस्तानात परतल्यावर

अर्शदवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.

सुवर्णपद जिंकल्यानंतर अरशद नदीमला 50 हजार डॉलर बक्षीस म्हणून मिळाले.

मरयम यांनी अरशदचे स्वागत करुन त्याला कारची चावी दिली आहे,

विशेष म्हणेज अरशदला देऊ केलेल्या कारचा नंबरही खास आहे.

या गाडीचा नंबर इतर गाड्यांप्रमाणे असणार नाही. या कारचा नंबर स्पेशल असणार आहे.

अरशदने पॅरीस ऑलिंपिकमध्ये जेवढ्या ताकदीने भाला फेकला, त्याचा भाला ज्या अंतरावर जाऊन पडला

आणि त्याने गोल्ड जिंकले. अरशदने 92.97 मीटर लांब भाला फेकला होता.

त्यामुळे, मरयम यांच्याकडून अर्शदला देण्यात येणाऱ्या कारचा नंबरही ‘PAK-9297’ असा खास नंबर असणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/gansamrajni-lata-mangeshkar-award-announced-to-anuradha-paudwal/

Related News