ब्यूनस आयर्स – फुटबॉल, लिओनेल मेसी आणि माराडोना यासाठी जगभर प्रसिद्ध
असलेल्या अर्जेंटिनाच्या हाती आता सोन्याचा खजिना लागला आहे.
सेंट जॉन राज्यातील सीमावर्ती भागात सोने,
चांदी आणि तांब्याचा प्रचंड साठा सापडल्याने आर्थिक संकटाशी झुंजणाऱ्या या देशाचे नशीब सोन्यावाणीच उजळले आहे.
गेल्या ३० वर्षांतील हा सर्वात मोठा शोध मानला जात असून अर्जेंटिनाच्या
शेजारी चिली सीमेजवळ ही खाण आढळून आली आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, या खाणीत तब्बल १२ दशलक्ष टन (१.२ कोटी टन) तांबे,
जवळपास ८० लाख औंस म्हणजेच सव्वा दोन लाख
किलो सोने आणि मोठ्या प्रमाणावर चांदीचा साठा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृषिप्रधान अर्जेंटिना फुटबॉलसाठी प्रसिद्ध असला तरी
आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकलेला देश आहे.
त्यामुळे हा खजिना देशासाठी ‘लॉटरी’ ठरणार असून अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या खजिन्याचे उत्खनन करताना पर्यावरणीय नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल.
मे अखेरीस सापडलेला हा खजिना दक्षिण अमेरिकेतील
खाण आणि खनिज क्षेत्रातील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/ganeshotsav-surreet-padawa-mhanun-poleson-talukat-root-march/