सोने-चांदीचा सलग दुसर्‍या दिवशी ग्राहकांना दिलासा, किंमती इतक्या उतरल्या

सोने-चांदीचा सलग दुसर्‍या दिवशी ग्राहकांना दिलासा, किंमती इतक्या उतरल्या

गेल्या दोन आठवड्यात महागाईचे तोरण बांधणाऱ्या सोने आणि चांदीने दोन दिवसांपासून नरमाईचे धोरण स्वीकारले आहे.

या मौल्यवान धातुच्या किंमती उतरल्या आहेत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत

किंमती?गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीने महागाईचा झेंडा लावला.

Related News

ग्राहकांना मोठा फटका बसला. बजेटपूर्वी किंमती चढ्याच राहण्याची भीती व्यक्त होत होती.

या काळात सोने 3,000 रुपयांनी तर चांदी हजार रुपयांनी महागली होती. पण या सोमवार-मंगळवारी दोन्ही धातुत घसरण झाली.

ग्राहकांना दिलासा मिळाला. लग्न सराईत खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मौल्यवान धातू खरेदीची संधी मिळाली.

18K, 22K, 24K सोन्याचा आणि एक किलो चांदीच्या आता अशा आहेत किंमती.15 दिवसात सोने 3000 रुपयांनी महागले होते.

तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. सोमवारी सोने 170 रुपयांनी

तर मंगळवारी त्यात 320 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 75,250 रुपये

प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 82,080 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा ग्राहकांना दिलासा

15 दिवसात चांदी 4 हजार रुपयांनी महागली होती. त्यानंतर 18 ते 23 जानेवारीपर्यंत भावात बदल झाला नाही.

तर 24 जानेवारीला 1 हजार रुपयांनी चांदी महागली होती. 27 जानेवारी रोजी त्यात 1 हजार रुपयांची घसरण दिसली.

काल किंमतीत बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA)

24 कॅरेट सोने 80,313, 23 कॅरेट 79,991, 22 कॅरेट सोने 73,567 रुपयांवर आहे.

18 कॅरेट आता 60,235 रुपये, 14 कॅरेट सोने 46,983 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.

एक किलो चांदीचा भाव 89,750 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात

सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क

आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/ya-deshchaya-netyavar-trump-yancha/

Related News