घोडेगाव खून प्रकरण : आईच्या हत्येप्रकरणी फरार मुलगा अखेर ताब्यात!

घोडेगाव खून प्रकरण : आईच्या हत्येप्रकरणी फरार मुलगा अखेर ताब्यात!

अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातल्या घोडेगाव येथे शेतीच्या वादातून जन्मदात्या आईच्या डोक्यावर

कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून करणाऱ्या फरार आरोपीला अखेर तीन महिन्यांनंतर पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी विनोद समाधान तेलगोटे यास अहिल्यानगर येथून ताब्यात घेण्यात आले.

Related News

याप्रकरणी तेल्हारा पोलिस ठाण्याचे पोलिसांनी कार्यवाही करत आरोपीस अटक केली.

१९ मार्च रोजी आरोपी विनोदने शेतीच्या हिश्शाच्या वादातून आई-वडिलांशी भांडण करून त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले.

यात त्याची आई बेबाबाई ऊर्फ गोकर्णा तेलगोटे जखमी झाली. उपचारादरम्यान बेबाबाई यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर फिर्यादी विजय तेलगोटे यांनी तक्रार नोंदविली होती. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनोद यास दारूचे व्यसन असून,

तो आई-वडिलांशी नेहमीच शेतीच्या हिस्सा व उत्पन्नाच्या पैशांवरून वाद घालत असे.

१९ मार्चच्या रात्रीच्या घटनेत त्याने नियंत्रण गमावून थेट कुन्हाडीने प्राणघातक हल्ला केला.

Byte – प्रमोद उलेमाले, पोलीस निरीक्षक, तेल्हारा

Read Also :   https://ajinkyabharat.com/kartwadi-and-yethil-jap-primary-marathi-shachchi-permanent-station/

Related News