कारंजा (लाड) – ३१ ऑगस्ट रोजी ग्राम गायवळ येथील किरण रमेश टाले (२४) यांच्या
घरासमोरून पेंशन प्रो हिरो कंपनीची काळी मोटारसायकल (MH 37 Y 2505,
किंमत सुमारे 60,000 रुपये) चोरी झाली होती.
फिर्यादीवरून पोलीस स्टेशन कारंजा ग्रामीणमध्ये कलम 303(2) भारतीय न्यायसंहिता
अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली
व पोलीस निरीक्षक प्रविण शिंदे यांच्या आदेशाने तपास पथक तयार केले गेले.
गुप्त माहितीच्या आधारे काही तासांतच
आरोपी प्रविण बबन गोदमले (वय 20, रा. गायवळ) यास ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली आणि चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.
पुढील तपास पो.उप.नि. स्वप्नील चव्हाण करीत आहेत.
Read also : https://ajinkyabharat.com/shatabdi-mahotsavat-raktadanacha-utsav-75-datyancha-participation/