घरासमोरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करा

घरासमोरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करा

अकोट

अकोट शहरातील रामटेक पुरा आंबोळी वेस येथील श्रीमती प्रमिला पुरुषोत्तम अस्वार या महिलेने अकोट

नगर परिषद कडे त्यांच्या घरासमोरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा अशा आशयाची तक्रार केली आहे.

सदर महिलेने तक्रारीत म्हटले आहे की ती रामटेक पुरा येथील नझुल शीट न. 27 डी,प्लॉट न. 276 येथील

रहिवाशी असुन त्या महिलेचे घर पडले आहे.त्याच्या घरा समोर नगरपरिषदची जागा आहे.

त्यांच्या घरासमोरील नगरपरिषदेच्या जागेवर असलेल्या अतिक्रमानामुळे त्यांच्या रस्ता अडवला आहे.

त्यामुळे त्यांना बांधकाम करता येत नाही.तसेच रामटेक पुरा ते आंबोळी वेस जाण्या येण्यास जनतेसह त्या महिलेला त्रास होत आहे.

व अतिक्रमण केल्याने नालीचे पाणि अडून घराच्या आवारात येत आहे.

तसेच आंबोळी वेस ते रामटेकपुरा हा कावड मिरवणूक मार्ग असून तिथे मिरवणुकी दरम्यान वाहतुकीस अडथळा सुद्धा निर्माण होतो.

सदर महिलेने या आधी सुद्धा नगरपरिषद अकोट,नायब तहसीलदार अकोट,उपविभागीय अधिकारी अकोट,

जिल्हाधीकारी अकोला यांना विनंती अर्ज केला होता.त्यावेळेस नगरपरिषद ह‌द्दीतील असलेले अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते.

परंतु अजून पर्यंत कोणतेही अतिक्रमण काढून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली.

नसल्याने व आता सध्या अकोट शहरात चालु असलेल्या अतिक्रमण काढणे मोहिम दरम्यान सदर महिलेच्या घरासमोरील

अतिक्रमण काढून रामटेक पुरा ते आंबोळी वेस रास्ता मोकळा करावा असे तक्रार मध्ये म्हटले आहे.

तेव्हा अकोट नगर परिषद चे मुख्याधिकारी डॉ नरेंद्र बेंबरे या महिलेला न्याय मिळवून देता किंवा नाही या कडे शहरातील सुजाण नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/shetkayanchaya-prasanasathi-prahar-janashakti-parshiya-vati-chakkajam-movement/