गीता नगरजवळ पिकअप लोडिंग गाडी नाल्यात पलटी

गीता नगरजवळ पिकअप लोडिंग गाडी नाल्यात पलटी

अकोला – गीता नगर एमराल्ड कॉलनी परिसरात पिकअप लोडिंग गाडी मोठ्या नाल्यात पलटी झाल्याची घटना मंगळवारी घडली.

या गाडीत तब्बल ३५  क्विंटल तूर व सोयाबीन भरलेले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप गाडी शिंदखेळ येथून अकोल्यातील धान्य  मार्केटकडे येत होती.

दरम्यान, मार्गात अचानक एका दुचाकीने गाडीसमोर प्रवेश केला.

टक्कर टाळण्यासाठी चालकाने ब्रेक लावला, मात्र गाडीवरील ताबा सुटून ती थेट नाल्यात पलटी झाली.

अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहितीत स्पष्ट झाले असून, माल मात्र पाण्यात भिजला आहे. पुढील तपास सुरू आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/aries-private-goshti-and-bhavna-sadhya-dear-personish-share-karu-naka/