गोवंश कत्तलीसाठी बांधलेली जनावरे आणि गोमास जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

गोवंश कत्तलीसाठी बांधलेली जनावरे आणि गोमास जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

अकोला (प्रतिनिधी):

रामदासपेठ पोलीस ठाणे हद्दीतील कागजीपुरा मस्जिद समोर आज,

दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७ वाजता, गोवंश जातीची जनावरे निर्दयतेने कत्तलीसाठी

Related News

बांधल्याची आणि गोमास विक्रीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तातडीने छापा टाकण्यात आला.

या कारवाईत ३ गोवंश जातीची जनावरे आणि ४५ किलो गोमास

असा एकूण ९६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी १) शेख जुनेद शेख बबु (२५), रा. शादाब नगर, अकोट फैल आणि २)

मोहम्मद शब्बीर कुरेशी (३०), रा. कागजीपुरा, अकोला यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा

कलम ५(अ), ५(ब), ५(क), ९, ९(अ) सह कलम ११ प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी

सतिष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक प्रदीप जोगदंड व त्यांच्या पथकाने केली.

Related News