गावंडगाव तलाव 100% भरल्याने विसर्ग सुरू

गावंडगाव तलाव 100% भरल्याने विसर्ग सुरू

अकोला : पातुर तालुक्यातील मळसूर गावाजवळ असलेला गावंडगाव तलाव शंभर टक्के भरल्यामुळे

त्याचा पाण्याचा विसर्ग सध्या विश्वमित्र नदीत सुरू आहे.

त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी पाटबंधारे

विभागाने स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

मळसूर परिसरात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाचा कहर सुरू आहे.

त्याचा परिणाम म्हणून गावंडगाव तलाव भरून वाहू लागला असून, अतिरिक्त पाणी थेट नदीत सोडले जात आहे.

या विसर्गामुळे विश्वमित्र नदीतील पाणीपातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रशासनाने स्थानिकांना नदीच्या जवळ न जाण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

आपत्कालीन स्थितीत मदत आणि बचाव कार्य तत्काळ सुरू करता येईल, यासाठी यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

गावकऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/hivarkhedchaya-bhopay-bandhuncha-satasamudrarapar-yash/