गावकऱ्यांची पुनर्वसनाची जोरदार मागणी

गावकऱ्यांची

 गावकऱ्यांची पुनर्वसनाची जोरदार मागणी

रिसोड : रिसोड तालुक्यातील करडा येथील तलाव सध्या अतिशय धोकादायक स्थितीत असून, पाण्याचा प्रवाह शंभर टक्के गावाकडे वळत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची भीती वाढली असून, गावकऱ्यांनी तत्कालीन पुनर्वसनासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन दिले आहे.करडा तलावाची निर्मिती सुमारे ३० वर्षांपूर्वी झाली असून, संरक्षण भिंतींची स्थिती अत्यंत गंभीर आहे. झाडं व मोठे वृक्ष भिंतीवर उगवल्यामुळे खिळाखिळ अवस्था निर्माण झाली आहे. शिवाय सायाळ, खेकडे यांसारख्या वन्य प्राण्यांमुळे भिंतीमध्ये सुमारे २० फुटापर्यंत नळे पडून गेली आहेत. मागील पाच वर्षांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असून, प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी दिल्या गेलेल्या असल्या तरीही अद्याप कारवाई नाही.गावकऱ्यांच्या मते, तलावातून दरवर्षी माती व उपसा होत असल्यामुळे पाण्याची क्षमता तीन पटीने वाढली आहे. संरक्षण भिंतीपासून फक्त २०० मीटरवरच गाव असून, तलावाची सपाटीपासून गावाचे अंतर केवळ १२ फूट आणि पाण्याच्या मर्यादेपेक्षा तब्बल ६५ फूट खाली आहे. त्यामुळे कोणतीही आपत्ती उद्भवल्यास संपूर्ण गावावर संकट येण्याची भीती आहे.करडा गावकऱ्यांनी अनंतरावजी देशमुख माजी मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी व जिल्हा जलसंधारण अभियंता यांना पुनर्वसनासाठी निवेदन दिले आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे.

गावकऱ्यांचा मुख्य दावा असा आहे की –“पुनर्वसनाशिवाय कोणताही पर्याय उरत नाही, अन्यथा मोठी मानवी हानी होण्याची शक्यता आहे.”सदर प्रकरणी पुढील तपास व प्रशासनाची तत्परता पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

read also : https://ajinkyabharat.com/citizens-should-be-alert-administration-warns/?preview_id=21199&preview_nonce=de59769db7&post_format=standard&_thumbnail_id=21200&preview=true