गावकऱ्यांची निलंबनाची मागणी

मुख्याध्यापकाची चुप्पी, शाळा कुलूपात, विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

बारलींगा जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक संतोष गवईवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केल्याचा आरोप,

बारलींगा :दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी बारलींगा येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संतोष गवई यांनी कोणतीही रजा न घेता दुपारी दोन वाजता शाळेला कुलूप लावून निघून गेले, ज्यामुळे गावात संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळा समितीचे अध्यक्ष देवानंद डोईफोडे यांनी मुख्याध्यापकांशी रस्त्यात भेटल्यानंतर “मी मिटींगला जात आहे” असे सांगितले. मात्र समिती अध्यक्षांनी गटशिक्षणाधिकारी निकम साहेब आणि केंद्रप्रमुख गणेश डिगोळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या दिवशी कुठलीही अधिकृत बैठक नसल्याचे स्पष्ट झाले.

गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी संतोष गवई यांना विचारणा केली असता, त्यांनी धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी संतोष गवई यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करून निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

read also :https://ajinkyabharat.com/popat-banala-mobile-pramin-social-media-ear/