उरळ बु – दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी उरळ बु येथील तंटामुक्ती अध्यक्षपदी आयु. देविदास रामभाऊ वानखडे उर्फ बाळूभाऊ यांची अविरोध निवड करण्यात आली. यानिमित्त ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. अन्नपूर्णाबाई त्र्यंबक वानखडे होत्या. तर उपसरपंच रविंद्र पोहरे, सचिव वाकोडे साहेब, तसेच सदस्य रामचंद्र वानखडे, सौ. वनिता शरद वानखडे, सौ. रूपाली अनंत पोहरे, दिवाकर वाकोडे, सौ. कल्पनाबाई हिंमतराव वानखडे, सौ. संतोषी सुनिल पोहरे, मंचितराव पोहरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी माजी सरपंच त्र्यंबक पूर्णाजी वानखडे, तसेच साहेबराव वानखडे, शांताराम वानखडे, रावजी वानखडे, मैदान वानखडे, बळीराम वानखडे, रोहिदास वानखडे, शरद वानखडे, विकास वानखडे यांच्यासह समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडीमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, नव्याने निवड झालेल्या तंटामुक्ती अध्यक्ष देविदास (बाळूभाऊ) वानखडे यांना गावकऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/asia-cup-2025-bharatacha-pahila-face-10-supportmen-uaeeevit-dup/