गौतमी पाटील एका शोसाठी तब्बल ३ ते ५ लाख रुपये; मानधन ऐकून चाहत्यांनाही बसतोय धक्का!
लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी गौतमी पाटील आज महाराष्ट्रातल्या सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही.
तिचे लाखो चाहते आहेत. प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल्ल होतो. दहीहंडीच्या उत्सवातदेखील तिच्या नृत्याला प्रचंड गर्दी जमली होती.
पण सगळ्यांनाच पडलेला प्रश्न म्हणजे – गौतमी एका शोसाठी किती मानधन घेते?
एका शोसाठी ३ ते ५ लाख रुपये
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गौतमी पाटील एका शोसाठी तब्बल ३ ते ५ लाख रुपये मानधन घेते. तिच्या टीमसह मिळून महिन्याची एकूण कमाई तब्बल ४५ ते ५० लाख रुपयांच्या घरात पोहोचते, असं म्हटलं जातं.
दहीहंडीला हजेरी – चाहत्यांची तुफान गर्दी
मुंबईच्या बोरिवलीतील दहीहंडी उत्सवात गौतमीने हजेरी लावली होती. तिच्या नृत्याला प्रचंड दाद मिळाली.
गावागावांत, विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांमध्ये तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/vande-bharat-express-tabal-din-tas-khoambali/